(Image Source : Internet)
तुळजापूर:
तुळजापूरमध्ये (Tuljapur) गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या ड्रग्ज तस्करी प्रकरणाने आता एक नवे वळण घेतले असून, तुळजाभवानी मंदिरातील तेरा पुजाऱ्यांची नावे या प्रकरणात समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजा यांनी पोलिसांकडून आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवली आहे.
विशेष बाब म्हणजे या पुजाऱ्यांचा काही राजकीय पक्षांशीही संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे यांनी स्पष्ट केले की, आरोपी असलेले पुजारी देवीच्या रोजच्या पूजेसाठी जबाबदार नसून, संपूर्ण पुजारी वर्गाला बदनाम करू नये. त्यांनी यापूर्वीच ड्रग्ज तस्करीविरोधात आवाज उठवल्याचा दावाही केला.
आतापर्यंत या प्रकरणात ३५ आरोपींची नावे समोर आली असून, त्यापैकी २१ आरोपी अद्याप फरार आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले असून, काँग्रेसने भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्यावर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींचे संबंध असल्याचा आरोप केला आहे, तर भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस खासदार निंबाळकर यांचे आरोपींसोबतचे फोटो व्हायरल करत निशाणा साधला आहे.संपूर्ण प्रकरण आता तुळजाभवानी मंदिरापर्यंत पोहोचल्याने पुढील कारवाईवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठवाड्यात सायंकाळनंतर तापमानात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत उष्णतेची तीव्रता अधिक जाणवण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तापमान ४० अंशांहून अधिक आहे.
मुंबई व उपनगरांतही उष्ण व दमट हवामानाची परिस्थिती कायम राहणार असून, नागरिकांना उन्हापासून संरक्षणासाठी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, देशभरात तापमानात वाढ होत असून राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरातसह ९ राज्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. राजस्थानातील काही भागात 45.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली असून, ते सध्या देशातील सर्वात उष्ण ठिकाण ठरत आहे.
एप्रिल ते जून दरम्यान तापमान सरासरीपेक्षा जास्त -
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, एप्रिल ते जून या काळात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे. यंदा एप्रिलमध्ये राज्यात उष्णतेच्या लाटा जाणवण्याची शक्यता असून, नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मार्च महिन्यात अवकाळी पावसामुळे उष्णता कमी जाणवली होती. मात्र, एप्रिलमध्ये तापमान सातत्याने वाढत असून, उन्हाचा तडाखा अधिकच जाणवू लागला आहे.