(Image Source : Internet)
नागपूर:
गेल्या काही दिवसांपासून तापमानात सतत वाढ होत असताना, बुधवारी दुपारी नागपूरकरांना वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसाने मोठा दिलासा दिला. उन्हाच्या झळांमुळे हैराण झालेले नागपूरकर या अचानक आलेल्या पावसामुळे सुखावले.
दुपारच्या सुमारास शहराच्या विविध भागांमध्ये आकाश ढगाळ झाले. काही मिनिटांतच वाऱ्याचा वेग वाढत गेला. या वादळी वातावरणानंतर जोरदार सरींनी हजेरी लावली.
नागपुरात तापमान सरासरी ४१-४३ अंशांवर पोहोचल्याने नागरिक त्रस्त झाले होते. मात्र पावसामुळे हवामानात गारवा निर्माण झाला असून, तापमानातही काही अंशी घट झाली आहे.