(Image Source : Internet)
मुंबई :
देशात पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्यानं सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली आहे. त्यांनी भाजपच्या महिला नेत्यांना थेट आव्हान देत, जर खरोखर महिलांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असाल, तर रस्त्यावर उतरा, असे म्हटले आहे.
रमहागाईच्या स्फोटाची जबाबदारी कोण घेणार?
राऊत म्हणाले, जगभरात इंधन दर घसरत असताना भारतात दर वाढत आहेत, ही कोणती निती? सरकार केवळ निवडणुकांच्या तोंडावर गाजर दाखवतं आणि नंतर लोकांच्या खिशावर डल्ला मारते.
कंगना-इराणींना खुले आव्हान -
“स्मृती इराणी आणि कंगना राणावत यांना आव्हान देतो की, रस्त्यावर या, आंदोलनात सहभागी व्हा. सिलिंडर आम्ही पुरवू, अशी जोरदार टिप्पणी करत राऊतांनी भाजपवर टीकेची झोड उठवली.राऊतांनी यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका करत म्हटले.भाजपच्या खांद्यावर बसून सत्तेत आलेल्या शिंदेंच्या पक्षाचं स्वतंत्र अस्तित्वच राहिलेले नाही.