(Image Source : Internet)
नागपूर :
राज्यात उष्णतेचा पारा 44 अंशांपर्यंत पोहोचल्यामुळे विदर्भातील शाळांच्या परीक्षांचे वेळापत्रक (Exam schedule) बदलण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. वाढलेल्या तापमानामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करत न्यायालयाने शिक्षण विभागाला तातडीने सुधारित वेळापत्रक जारी करण्याचे निर्देश दिले.
शिक्षण विभागाने यावर्षी राज्यभरात एकाच दिवशी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामुळे विदर्भातील परीक्षा एप्रिलच्या अखेरपर्यंत लांबलेल्या होत्या. यावर विदर्भातील शाळांनी आणि शिक्षक संघटनांनी विरोध केला होता. न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे विदर्भातील शाळांनी आपल्या परीक्षांचे वेळापत्रक लवकर जाहीर करणे अपेक्षित आहे.
पहिली ते नववीच्या परीक्षा प्रारंभ;
आजपासून (8 एप्रिल) राज्यभरात पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होत असून, 25 एप्रिलपर्यंत या परीक्षा संपविल्या जातील. यंदा नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन मूल्यांकन पद्धती लागू करण्यात आली आहे, ज्यामुळे शिक्षण विभागाच्या निर्णयांना काही संघटनांचा विरोध झाला आहे.