(Image Source : Internet)
मुंबई :
कोकणातील काँग्रेस नेते सहदेव बेटकर (Sahdev Betkar) यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधत पक्षात स्वागत केलं. यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण करत कोकणात नव्या संघर्षाची नांदी झाली असल्याचे स्पष्ट केलं.
सहदेवच्या आगमनाने कोकणात महायुद्धाची सुरूवात झाली आहे. हे युद्ध आपण जिंकणारच आहोत. आता मैदान बदलायचं नाही, हे शेवटचं रण आहे,” असं संजय राऊत म्हणाले. त्यांनी कोकणातील कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवत रत्नागिरी जिल्ह्यात भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला.
सहदेव बेटकर म्हणाले, मातोश्री माझं घर आहे. 1992 साली मोठ्या साहेबांच दर्शन झाले. आज पुन्हा इथे आलोय, घरात आलोय, असंच वाटते त्यांच्या भाषणाने उपस्थित शिवसैनिकांमध्ये जोश संचारला.
उद्धव ठाकरे यांनीही आपली भूमिका स्पष्ट करत, मी कोकणात फक्त एक पाऊलच टाकणार नाही, तर संपूर्ण कोकण पादाक्रांत करणार आहे. शिवसेना हा जनतेच्या मनातला पक्ष आहे. दिलेला शब्द पाळणारा एकमेव पक्ष म्हणजे शिवसेना,असे ठाम विधान केले.
यावेळी अनेक शिवसैनिक, स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहदेव बेटकर यांच्या प्रवेशामुळे कोकणातील राजकारणाला नवी दिशा मिळण्याची चिन्हं आहेत.