(Image Source : Internet)
मुंबई :
राज्यात उन्हाच्या तीव्र झळा वाढत असून, विदर्भ, कोकण आणि मराठवाडा भागात तापमानाने चाळीशी ओलांडल्याने जनजीवन विस्कळीत होत आहे. हवामान खात्याने पुढील २४ तासांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून, नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चाळीशी पार तापमान, विदर्भात उष्णतेचा कहर -
गेल्या काही दिवसांत अवकाळी पावसाला ब्रेक लागल्यानंतर अकोला, नागपूर, यवतमाळ, अमरावती, परभणी, संभाजीनगर अशा भागांतील तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. पारा ४० अंशांच्या पुढे गेला असून पुढील काही दिवसांत २-३ अंश वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
कोकणात उकाडा, यलो अलर्ट जारी -
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांत उष्णता आणि दमट हवामानामुळे असह्य उकाडा जाणवत आहे. यामुळे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक, सोलापूर आणि जळगाव या भागांमध्येही उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे.
ढगाळ वातावरण पण तापमानात वाढ -
बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात काही भागांत ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. तरीसुद्धा तापमान वाढत असल्याने उकाड्याची तीव्रता अधिक जाणवत आहे. कर्नाटक आणि तामिळनाडूच्या भागातील हवामानातील बदलांचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवत आहे.
१० एप्रिलनंतर बदलाची शक्यता -
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, १० एप्रिलनंतर राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता आहे. विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हवामानात मोठा बदल होण्याची चिन्हं आहेत.
शेतकऱ्यांसाठी सतर्कतेचा इशारा -
हवामानातील सतत बदल पाहता, शेतकऱ्यांनी पिकांचं योग्य नियोजन करावं, असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे. पावसाच्या शक्यतेमुळे उघड्यावर ठेवलेली धान्यं, खतं सुरक्षित ठिकाणी हलवावीत.
सामान्य नागरिकांसाठी सूचना
-उन्हात बाहेर पडताना डोकं आणि शरीर झाकून ठेवा
-भरपूर पाणी आणि लिक्विड डाएट घ्या
-शक्यतो दुपारी