(Image Source : Internet)
नंदुरबार :
राज्यात मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील शेतीचे मोठे नुकसान झाले असून, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी नुकसानग्रस्त भागांमध्ये तातडीने पंचनामे करण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आणि कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
कोकाटे यांनी नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा येथील पावसामुळे बाधित झालेल्या कांदा पीकाचे निरीक्षण केले. यावेळी त्यांनी सांगितले की, या पावसामुळे २४ जिल्हे आणि १०३ तालुके प्रभावित झाले असून, पुढील ८ दिवसांत पंचनामे पूर्ण होतील आणि नुकसानाचे अचूक चित्र स्पष्ट होईल.
कृषी मंत्री म्हणाले की, नुकसानभरपाईबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना योग्य मदत दिली जाईल. तसेच, केंद्र सरकारकडून देखील मदतीची अपेक्षा असून, कांदा पिकाबाबत केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांना प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे आश्वासन कृषी मंत्री कोकाटे यांनी दिले.