कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा; अटकेपासून संरक्षणाची मुदत १७ एप्रिलपर्यंत वाढवली

    07-Apr-2025
Total Views |
 
Madras HC
 (Image Source : Internet)
मुंबई/चेन्नई :
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सादर केलेल्या विडंबनात्मक गाण्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) यांना मद्रास उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कामराला अटक होऊ नये यासाठी दिलेले अंतरिम अटकपूर्व जामिनाचे संरक्षण १७ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आले आहे.
 
या प्रकरणात शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले असून, कामराच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी ७ एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आले होते, मात्र आज ही मुदत संपल्याने न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. न्यायालयाने कामराच्या बाजूने निर्णय देत अतिरिक्त दिलासा दिला.
 
दरम्यान, दुसरीकडे कामराने मुंबई उच्च न्यायालयातही धाव घेतली असून, खार पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे आणि मुंबई उच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.