नागपुरात मॉडेलिंगच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश;चार पीडितांची सुटका, दोघांना अटक

    05-Apr-2025
Total Views |
 
two arrested Sex racket
 (Image Source : Internet)
नागपूर :
शहरातील सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने एका मोठ्या सेक्स रॅकेटचा (Sex racket) पर्दाफाश केला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून चार पीडित युवतींची सुटका केली आहे. विशेष म्हणजे, हा गैरकृत्याचा धंदा "ओयो" हॉटेलच्या खोलीत सुरू असतानाच तेथे बेकायदेशीरपणे हुक्का सुद्धा पुरवला जात होता.
 
ही कारवाई छावणीतील काटोल रोडवरील अचरज टॉवर येथील "हॅप्पी स्प्रिंग" नावाच्या ओयो हॉटेलमधील रूम नंबर 202 मध्ये करण्यात आली. येथे चेतन विजय चकोले (वय 19) आणि युगांत दिनेश दुर्गे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
 
तपासात समोर आले की, चेतन विजय चकोले हा युवक स्वतः हे ओयो हॉटेल चालवत होता. छापेमारीवेळी पकडलेल्या युवतींपैकी दोन चंडीगडहून, एक दिल्लीहून आणि एक भिलाईहून येथे बोलावण्यात आली होती. मुंबईतील दलाल राहुल घाटोले आणि दीपक यांच्या माध्यमातून या युवतींना पैशांचे आमिष दाखवून नागपूरमध्ये आणण्यात आले होते.
 
पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने आधी व्यवहार निश्चित केला आणि त्यानंतर छापा टाकून आरोपींना रंगेहात पकडले. हॉटेलच्या खोलीत देहविक्रीसह ग्राहकांना हुक्काही पुरवला जात होता.
 
या प्रकरणी सदर पोलिस ठाण्यात संबंधित कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सध्या पोलिस मुंबईतील दोन्ही दलालांचा शोध घेत आहेत.