...तर आम्ही शेतकऱ्यांची माफी मागणार;कोकाटेंच्या वक्तव्यावर बावनकुळे यांची भूमिका

    05-Apr-2025
Total Views |
 
Chandrashekhar Bawankule on Manikrao Kokate
 (Image Source : Internet)
नागपूर :
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत, सरकार शेतकऱ्यांची माफी मागण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले आहे.
 
नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना बावनकुले म्हणाले, शेतकऱ्यांच्या भावना दुखावणारे कोणतेही वक्तव्य अयोग्य आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत सरकार पूर्णपणे जबाबदार असून, त्यांना योग्य ती मदत केली जाईल.
 
ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यांच्या मदतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही. मंत्र्यांनी बोलताना काळजी घ्यायला हवी. जर काही चुकीचे बोलले गेले असेल, तर सरकारकडून माफी मागण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असे बावनकुळे म्हणाले.