(Image Source : Internet)
मुंबई :
अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली. राऊतांनी प्रफुल पटेल यांना दलाल म्हटले.
यावरून राजकीय वर्तुळात देखील प्रतिक्रिया उमटत आहेत. तर आता राऊतांच्या या विधानावर प्रफुल पटेल यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
माझ्या चारित्र्यावर आणि इतिहासावर बोलण्याआधी आपण पवार साहेबांकडून माहिती घेतली असती तर बरं झाले असतं, अशी प्रतिक्रिया प्रफुल पटेल यांनी दिली आहे. X अकाउंटवर त्यांनी पोस्ट करत राऊतांना उत्तर दिले.
संजय राऊत यांनी माध्यमांसमोर प्रफुल पटेल दलाल, माझ्या नादाला लागू नको, नागडा करेन अशी धमकी दिली आहे. प्रफुल्ल पटेल, ज्यांनी बापाच्या पाठीत खंजिर खुपसला तो माणूस रंग बदलला म्हणतो. ज्या प्रफुल्ल पटेलांना मोदींनी दाऊदचा हस्तक असल्याचा आरोप केला होता. त्यांच्यावर इडीची कारवाई झाली. आपली संपत्ती वाचवण्यासाठी भाजपमध्ये गेले, असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला होता. अमित शहांनी वॉशिंगने पटेलांना धुवून घेतलं. अजित पवार यांनी स्वत: चे अवमुल्यन करुन घेतलंय. पटेलसारखे लोक दलाल असून त्यांनी आधी काँग्रेसची, दाऊदची दलाली केली असं वाटत असल्याची बोचरी टीका संजय राऊतांनी केली आहे. यावर आता पटेलांनी प्रत्युत्तर दिले.