देशाच्या सुरक्षेसाठी घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही निर्णयाला आमचा पाठिंबा; शरद पवारांचे विधान

    30-Apr-2025
Total Views |
 
Sharad Pawar
 (Image Source : Internet)
मुंबई :
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी कठोर शब्दांत निषेध व्यक्त करत केंद्र सरकारला सर्वतोपरी पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. देशावर झालेला हा थेट हल्ला असून, राजकारण बाजूला ठेवून एकजुटीने उत्तर देणे गरजेचे असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
 
ठाण्यात एका धार्मिक कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना, पवार म्हणाले, “ज्यांनी हल्ल्यात प्राण गमावले, त्यांनी देशासाठी बलिदान दिलं आहे. इथे कोणताही धार्मिक किंवा जातीय रंग देऊ नका. देशाच्या सुरक्षेसाठी घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही निर्णयाला आमचा पूर्ण पाठिंबा असेल.
 
ठाकरे बंधू एकत्र येण्यावर पवारांचे सूचक विधान-
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य एकत्रित येण्याच्या चर्चांवरही विचारले असता, पवार म्हणाले, जर त्यांच्यात समेट होणार असेल, तर त्याचे स्वागतच आहे. मात्र, सध्या त्यावर जास्त बोलणे योग्य ठरणार नाही.
 
दरम्यान, ठाकरे बंधूंनी अलीकडेच संयुक्त परदेश दौरा केल्याने त्यांच्या राजकीय जवळीकीची शक्यता वाढली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, हे महाराष्ट्रासाठी चांगलेच,असे मत याआधी व्यक्त केले आहे.