जनआक्रोशने दिले पोस्‍टमनला रस्‍ते सुरक्षेचे प्रशिक्षण

    03-Apr-2025
Total Views |
 road safety training  
नागपूर :
3 एप्रिल ला जनआक्रोश फॉर बेटर टुमारो या रस्‍ते सुरक्षा विषयावर जनजागृती करणा-या सामाजिक संस्‍थेने शंकर नगर येथील पोस्‍ट ऑफिस मध्‍ये कार्यरत असलेल्‍या पोस्टमनसाठी ‘रस्ते वाहतूक सुरक्षा’ विषयाचे प्रशिक्षण वर्ग आयोजित केला होता. या प्रशिक्षण वर्गामध्‍ये मोठ्या संख्‍येने पोस्‍टमन यांनी सहभाग नोंदवला. यावेळी जनआक्रोशचे अध्यक्ष प्रकाश खांडेकर, सचिव रवींद्र कासखेडीकर आणि कोअर ग्रुपचे ज्ञानेश पाहुणे यांनी उपस्‍थ‍ित पोस्‍टमनला मार्गदर्शन केले. पोस्‍ट ऑफिसच्‍या इतरही कर्मचा-यांनी या प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेतला व वाहतूक शिक्षणाचे महत्त्व समजून घेतले.
 
रस्त्यावरून प्रवास करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, वाहने चालवताना वाहतूकीचे नियम पाळणे किती महत्‍वाचे आहे, याबाबत त्‍यांनी जाणून घेतले. अशा प्रकारचे प्रशिक्षण वर्ग इतर संबंधित पोस्‍ट ऑफिसेसमध्‍ये घेतले जाणार आहेत. जनआक्रोश मागील 12 वर्षांपासून सर्व क्षेत्रामध्‍ये रस्‍ते सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्‍यात येत आहे. प्रत्‍येक्ष क्षेत्रातील तसेच, समाजातील लोकांना रस्‍ते अपघातांपासून स्‍वत:चा बचाव करता यावा या अनुषंगाने प्रशिक्षण देण्‍याचे काम करते.