नागपूर :
3 एप्रिल ला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व आनंदम योग वर्ग आणि जनार्दन स्वामी योग्याभ्यासी मंडळ, नागपूर यांच्या संयूक्त विद्यमाने सामाजिक पर्यटन सहल आयोजित करण्यात येणार आहे.
पर्यटकांना सामाजिक पर्यटनाच्या माध्यमाने आनंदवन व हेमलकसाला भेट देता येणार आहे. आनंदवन ही बाबा आमटेंची कर्मभूमी असून त्यांनी येथे महारोगी आरोग्य केंद्र उभारले आहे. तर लोकबिरादरी प्रकल्प हा चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील महारोग सेवा समितीचा आहे. सदर सहल दोन दिवस एक रात्र अशी राहणार असून 11 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता सिव्हिल लाईन्स, कार्यालय, नागपूर येथून निघणार आहे. याशिवाय, योग गुरू राम खांडवे आनंदम योग वर्गाला देखील 11 एप्रिल रोजी भेट देता येणार आहे. या सहलीमध्ये जास्तीत जास्त 20 लोक सहभागी होऊ शकतात.