(Image Source : Internet)
सोलापूर :
महाराष्ट्रातील सोलापूर (Solapur) जिल्ह्यात आज सकाळी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सांगोला तालुका हा भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे समजते. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने याबाबत माहिती दिली आहे.
आज सकाळी ११:२२ वाजता, पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढा भागात २.६ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. काही क्षणांसाठी असलेल्या या धक्क्यांमुळे लोक घराबाहेर पडले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याची नोंद नाही.
दरम्यान, सातारा जिल्ह्यातील कोयना परिसरात सातत्याने सौम्य भूकंपाचे धक्के जाणवत असतात. सोलापूरच्या भूकंपानंतर लातूरच्या १९९३ च्या भीषण भूकंपाच्या आठवणी नागरिकांच्या मनात ताज्या झाल्या आहेत. थायलंडमध्ये नुकत्याच झालेल्या तीव्र भूकंपाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील भूकंपाच्या घटनांमुळे नागरिक अधिकच चिंतेत आहेत.
दरम्यान भूकंपानंतर प्रशासनाची सतर्कता वाढवली असून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.