(Image Source : Internet)
नागपूर:
शहरातील इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील VR मॉलमध्ये (VR Mall) रविवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. मॉलच्या दुसऱ्या मजल्यावरून २० वर्षाच्या युवकाने अचानक उडी घेतल्याने मॉलमध्ये काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
घटनेची माहिती मिळताच इमामवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी युवकाला तातडीने मेडिकल रुग्णालयात दाखल केले. युवकाची ओळख नवीन नगर पारडी येथील गणपत राजेंद्र तिडके अशी झाली आहे.
वैद्यकीय तपासणींमध्ये उडी घेतल्यामुळे युवकाच्या उजव्या पायाला गंभीर फ्रॅक्चर झाले आहे. मात्र, मोठ्या भाग्यामुळे त्याचा जीव वाचला आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. युवकाने हे पाऊल का उचलले, याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. इमामवाडा पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत आणि युवकाच्या पावलामागील कारणांचा शोध घेत आहेत.