(Image Source : Internet)
पुणे:
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांची ओळख पटवली आणि त्यांना गोळ्या घालून ठार केलं. या घटनेवर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी एक वादग्रस्त विधान केलं, ज्यावर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.
वेट्टीवार यांनी म्हटलं, "दहशतवाद्यांना गोळीबार करताना लोकांशी संवाद साधता येतो का? ते धर्म विचारूनच गोळ्या घालत असतील का?" या विधानामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. विशेषत: ज्या कुटुंबीयांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम वेट्टीवारांनी केलं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी वेट्टीवारांना आपलं विधान मागे घेण्याची सूचना दिली आणि ते असंवेदनशील असल्याचं म्हटले. वेट्टीवारांनी मृतांच्या कुटुंबीयांच्या शब्दांना खोटं ठरवण्याचे कार्य केलं आहे. त्यांनी जे म्हटलं ते देशविरोधी मानसिकतेचं प्रतिबिंब आहे,असे फडणवीस म्हणाले.
वेट्टीवारांच्या विधानामुळे काँग्रेस आणि भाजप यांच्यातील तणाव आणखी वाढला आहे आणि हे वादग्रस्त विधान राज्यातील राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे.