(Image Source : Internet)
नागपूर :
हिंगणा विधानसभा मतदारसंघातील शरद पवार गटाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला बोढारे (Ujjwala Bodhare) यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शनिवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी, आमदार समीर मेघे यांच्या प्रमुख उपस्थितीत बोढारे यांनी भाजपची सदस्यता
यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, समीर मेघे यांच्या नेतृत्वाखाली हिंगणा परिसरातील १८ सरपंच तसेच ९० ग्रामपंचायत सदस्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उज्ज्वला बोढारे यांच्या पक्षप्रवेशामुळे नागपूर जिल्ह्याच्या राजकारणात भाजपला मोठे बळ मिळाले आहे, असेही बावनकुळे यांनी नमूद केले.
उज्ज्वला बोढारे यांच्या भाजपमध्ये प्रवेशामुळे हिंगणा विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमी झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. विशेषतः माजी मंत्री रमेश बंग, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि काँग्रेस नेते सुनील केदार यांना या घडामोडीमुळे मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
उज्ज्वला बोढारे यांची पार्श्वभूमी
उज्ज्वला बोढारे या दोन वेळा हिंगणा तालुक्यातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. एनसीपीच्या महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्या नेहमी एनसीपी नेते रमेश बंग यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जात. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी तयारी केली होती, मात्र रमेश बंग यांच्या निवडणुकीच्या इच्छेमुळे त्यांना मागे हटावे लागले. या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपचा हात धरला.
भाजपने हिंगणा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन स्वबळावर विजय मिळवण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत.