महाराष्ट्राचा पोलिस विभाग जगात सर्वात निष्क्रिय; आमदार संजय गायकवाड यांचे वादग्रस्त विधान

    26-Apr-2025
Total Views |
 
Sanjay Gaikwad
 (Image Source : Internet)
बुलढाणा :
नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे शिवसेना शिंदे गटाचे बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी पुन्हा एकदा वादाला तोंड फोडले आहे. शुक्रवारी संध्याकाळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्र पोलीस विभागावर गंभीर आरोप करत, "जगात महाराष्ट्र पोलिसांइतका निष्क्रिय विभाग दुसरा कोणी नाही," असे वक्तव्य केले.
 
गायकवाड म्हणाले, "माझ्या मुलाला धमकीचे पत्र प्राप्त झाले आहे. पण त्या घटनेवर येण्यापूर्वी मला सांगावेसे वाटते की, माझ्या गाडीला उडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेची चौकशी पोलिसांनी केली का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
 
ते पुढे म्हणाले, "जेव्हा जेव्हा सरकारने कोणताही नवीन कायदा लागू केला, तेव्हा पोलिसांचा 'हफ्ता' वाढला. गुटख्यावर बंदी आली तेव्हा हफ्ता वाढला, दारूबंदी जाहीर झाली तेव्हा दारू विक्रीसाठी हफ्ता वाढला."
 
आमदार गायकवाड यांनी असेही म्हटले की, जर राज्य आणि देशातील पोलीस प्रामाणिकपणे काम करतील, तर देशातील सर्व घाण साफ होऊ शकते."त्यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.