सोन्याचा दर गाठतो नवा शिखरबिंदू ; दहा ग्रॅमची किंमत पोहोचली एक लाख रुपयांवर

    22-Apr-2025
Total Views |
 
Gold price
 (Image Source : Internet)
मुंबई :
भारतातील सोन्याच्या (Gold) दराने आज ऐतिहासिक उच्चांक गाठला. सोमवारी संध्याकाळी देशभरात दहा ग्रॅम चोख सोन्याची किंमत प्रथमच एक लाख रुपयांवर पोहोचली. या अभूतपूर्व वाढीने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाची लाट पसरली आहे.
 
शहरानुसार सोन्याचे दर
दिल्ली: चोख शुद्धतेच्या सोन्याचा दर एक लाख एक हजार दोनशे पन्नास रुपयांपर्यंत गेला.
नागपूर: स्थानिक बाजारात खरेदीला गती मिळाली असून दर एक लाखाच्या जवळपास स्थिरावले.
मुंबई, कोलकाता, चेन्नई: सर्वच प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर एक लाख रुपयांच्या आसपास फिरताना दिसले.
 
मागील व्यवहार आणि करभार-
शुक्रवारी चोख सोन्याचा दर अठ्ठ्याण्णव हजाराच्या घरात होता. केवळ दोन दिवसांत जवळपास दोन हजार रुपयांनी वाढ झाल्याने बाजारात हालचाल वाढली आहे. यावर लागू होणारा तीन टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) ग्राहकाच्या अंतिम बिलात समाविष्ट होतो.
 
जागतिक परिणाम-
अमेरिका आणि चीनमधील व्यापार तणाव, तसेच डॉलरची कमजोरी यामुळे सोन्याकडे सुरक्षित गुंतवणुकीचे माध्यम म्हणून पाहिले जात आहे. या स्थितीचा थेट परिणाम भारतीय बाजारावरही दिसून येतोय.
एक लाख रुपयांचा टप्पा पार करून सोन्याने भारतातील गुंतवणूकविश्वात एक नवा अध्याय सुरू केला आहे. पुढे काय वाढून ठेवलंय, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.