- 5 एप्रिलपर्यंत हजर राहण्याचे आदेश
(Image Source : Internet)
मुंबई :
कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एका गाण्याच्या माध्यमातून टीका केली होती. याप्रकरणी कुणाल विरोधात खार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई पोलिसांनी तिसऱ्या समन्स द्वारे कुणाल कामरा याला 5 एप्रिलला खार पोलीस ठाण्यात हजर राहण्यास बजावले आहे.
यापूर्वी पोलिसांनी त्याला दोनदा समन्स बजावले. मात्र कुणाल कामरा याने आपण जिथे 10 वर्षापासून राहत नाही, तिथे जाणं म्हणजे वेळ व्यर्थ घालवणे आहे, अशी पोस्ट शेयर करुन मुंबई पोलिसांना आव्हान दिले.
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा अद्याप पोलिसांसमोर हजर झालेला नाही. एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये पक्षांतर्गत बंड करून 40 आमदारांसह पक्ष फोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या गाण्यात कुणाल कामरा यानं एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता गद्दार म्हटले. कुणाल कामरा याचे गाणं मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं. या गाण्यामुळे संतप्त झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या स्टुडिओची तोडफोड केली. कामराविरुद्ध मुंबई आणि ठाण्यात स्वतंत्र एफआयआर दाखल करण्यात आले आहे.