(Image Source : Internet)
बीड:
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज बीड दौऱ्यावर असून, त्यांनी विविध कार्यक्रमांतून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर युवा संवाद मेळाव्यात त्यांनी थेट गँग संस्कृतीविरोधात आक्रमक भूमिका घेतली. बीडमधील सगळ्या गँग सुतासारख्या सरळ केल्या जातील, असे अजितदादा म्हणाले.
युवा संवाद मेळाव्यात अजित पवारांनी बीडमधील विविध गँगवर ताशेरे ओढले. “इथे राखेची गँग आहे, वाळूची गँग आहे, पण या सगळ्या गँग सुतासारख्या सरळ केल्या जातील,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. बीड ही देव आणि देवतांची भूमी आहे, इथं गँग कल्चरने बदनामी होऊ नये, असं ते म्हणाले. याशिवाय, मराठा आणि वंजारी समाजांमध्ये वारंवार निर्माण होणाऱ्या वादांवरही त्यांनी भाष्य करत, आपल्याला जाती-जातीतील दुरावा संपवायचा आहे, असेही अजित पवार म्हणाले.