(Image Source : Internet)
मुंबई:
काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते आणि माजी आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) लवकरच भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत नुकतंच महत्त्वपूर्ण भेटीचं वृत्त समोर आलं आहे.
पुण्यात काँग्रेसची घसरण?
संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता मोठ्या प्रमाणावर व्यक्त केली जात असून, त्यांनी यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्याची तयारी सुरू केल्याचे समजते. पुणे जिल्ह्यात काँग्रेससाठी हे निश्चितच मोठं नुकसान ठरू शकतं, कारण थोपटे हे या भागातील प्रभावी आणि निष्ठावंत नेत्यांपैकी एक मानले जातात.
अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा?
मिळालेल्या माहितीनुसार, थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली असल्याचं बोललं जात आहे. या बैठकीनंतरच त्यांच्या पक्ष बदलण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नसला, तरीही थोपटे यांच्या संभाव्य प्रवेशामुळे राज्यातील राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.