(Image Source : Internet)
नागपूर:
काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या अनुपस्थितीमुळे काँग्रेसच्या नागपूरतील शांती रॅलीत चर्चांना उधाण आले आहे. 17 मार्च रोजी काँग्रेसने हिंसाचार विरोधी सद्भावना शांती रॅली आयोजित केली होती, यामध्ये अनेक प्रमुख काँग्रेस नेत्यांची उपस्थिती होती. परंतु, या कार्यक्रमात नाना पटोले नाहीत, ज्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.
नाना पटोले यांच्या अनुपस्थितीने काँग्रेसच्या अंतर्गत वादांना नवा रंग दिला आहे. अध्यक्षपदावरून हटविल्यानंतर ते पक्षाच्या नेतृत्वाशी नाराज असल्याचे सूत्रांनी सांगितले. रॅलीमध्ये प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाल, प्रदेश प्रभारी रमेश चेन्नाथीला, विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.
सूत्रांच्या मते, पटोले यांच्या पक्षाच्या नेतृत्वाविषयीच्या नाराजगीमुळेच त्यांनी या कार्यक्रमाला सामील होण्याचे टाळले. या स्थितीमुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत गदारोळ निर्माण होण्याची शक्यता आहे.