महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना सोडणार नाही ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान

    12-Apr-2025
Total Views |

CM FADNAVIS
(Image Source : Internet)
रायगड :
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर आता सरकारकडून कठोर पावले उचलली जाणार आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी जाहीर केले. अशा लोकांना टकमक टोकावरून लोटले पाहिजे, असे भावनिक उद्गार काढत त्यांनी लवकरच कायदा करण्याचे संकेत दिले.
 
ते रायगडावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात बोलत होते. फडणवीस म्हणाले की, छत्रपतींमुळेच आपली ओळख आणि अस्तित्व टिकून आहे. त्यांच्या प्रमाण इतिहासासाठी सरकार पुढाकार घेणार आहे.
 
त्याचबरोबर, अरबी समुद्रातील शिवस्मारक लवकरच पूर्ण करण्यात येईल, असेही ते म्हणाले. दिल्लीत राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी आणि १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती त्यांनी दिली. शिवरायांचा आदर्श आणि संविधान हेच आमचे मार्गदर्शक असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.