-NIAकडून न्यायालयात हजर
(Image Source : Internet)
नवी दिल्ली:
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) दिलेल्या माहितीनुसार, २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वूर हुसेन राणा (Tahawwur Hussain Rana) याचे प्रत्यार्पण गुरुवारी यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. अमेरिकेतील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, राणाला भारतात आणण्यात आले.
NIAने राणाला आज दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयासमोर हजर केले आहे. न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान, राणाच्या वतीने वरिष्ठ वकील पीयूष सचदेवा हे त्याची बाजू मांडत आहेत.
तहव्वूर राणा हा डेव्हिड कोलमन हेडलीचा जवळचा सहकारी असून, मुंबईवर २६/११ च्या हल्ल्याच्या कटामध्ये त्याचा थेट सहभाग असल्याचे NIAचे म्हणणे आहे. या हल्ल्यात १६६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता.
राणाच्या प्रत्यार्पणामुळे या प्रकरणात न्यायप्रक्रियेला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. NIA आता या प्रकरणाचा पुढील तपास अधिक सखोलपणे करणार आहे.