देवेंद्र फडणवीसांनी केला शब्द पूर्ण; प्रताप सरनाईक यांची एसटी महामंडळ अध्यक्षपदी नियुक्ती

    10-Apr-2025
Total Views |
 
Devendra Fadnavis appointed Pratap Sarnaik
 (Image Source : Internet)
 
राज्यात महायुती सरकार स्थापनेनंतर सुरू असलेला खातेवाटप आणि महामंडळांवरील नेमणुकांचा तिढा काहीसा सुटताना दिसतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलेला शब्द पाळत प्रताप सरनाईक यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
 
सरनाईक हे शिंदे गटाचे महत्त्वाचे नेते असून, या नेमणुकीमुळे शिंदे गटात समाधानाचे वातावरण आहे. एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत असताना, सरनाईक यांच्यावर ही जबाबदारी येत आहे. त्यांनी एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची वचनबद्धता व्यक्त केली आहे.