राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फूटीनंतरही शरद पवारच आमचे दैवत; अजित पवारांची भावनिक कबुली

    10-Apr-2025
Total Views |
 
Sharad Pawar Ajit Pawar
 (Image Source : Internet)
पुणे:
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फूटीनंतरही शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयीचा आदर आणि निष्ठा आजही तसूभरही कमी झालेली नाही, असं स्पष्ट वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. शरद पवार साहेब हेच आमचे राजकीय दैवत आहेत आणि कायम राहतील,असे भावनिक उद्गार अजित पवार यांनी एका कार्यक्रमात काढले.
 
पुण्यात आयोजित एका विकास कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले, राजकीय निर्णय हे वेळोवेळी घ्यावे लागतात, पण आमचे पवार साहेबांवरील प्रेम आणि आदर कायम आहे. मी त्यांच्याकडूनच राजकारण शिकलो आणि आज जिथे आहे, त्यांच्यामुळेच आहे.
 
या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील नात्याची घडी भले राजकीयदृष्ट्या ढासळली असली, तरी अजित पवारांच्या या विधानामुळे दोघांमधील व्यक्तिगत नातं अजूनही घट्ट असल्याचं स्पष्ट होतंय.
 
राजकीय विश्लेषकांच्या मते, आगामी महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे विधान महत्वाचे मानले जात आहे.