(Image Source : Internet)
प्रयागराज :
गेल्या ३० मार्च रोजी पंतप्रधान मोदींच्या संघ मुख्यालयाच्या भेटीनंतर त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांबाबत सध्या चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून पाहिले जात आहे. पंतप्रधान पदाबाबतच्या चर्चेवर योगी आदित्यनाथ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मी राजकारणात किती काळ राहीन याची एक कालमर्यादा आहे. मी कायमचा राजकारणात नाही.
उत्तर प्रदेशातील जनतेची सेवा करण्यासाठी मी मुख्यमंत्री पदावर आहे. मी मनापासून योगी आहे. मी कायमचे राजकारणात आलो नाही. माझ्या पक्ष भाजपने मला दिलेली जबाबदारी मी पार पाडत आहे.धर्माची राजकारणाशी सांगड घालणे चुकीचे आहे. आपण राजकारणाची जबाबदारी काही लोकांवर सोड, तो ही आपली चूक आहे. यामुळे समस्या निर्माण होतात.
राजकारणाचे उद्दिष्ट स्वार्थ पूर्ण करणे नाही तर समाजाचे भले करणे आहे. धर्माचे ध्येय देखील दान आहे. जेव्हा धर्माचा वापर स्वार्थी हेतूंसाठी केला जातो तेव्हा समस्या उद्भवतात; पण जेव्हा उद्देश परोपकारी असतो तेव्हा धर्म प्रगतीचा मार्ग मोकळा करतो, असेही योगी आदित्यनाथ यांनी यावेळी नमूद केले.