उद्धव ठाकरेंनी येत्या महापालिका निवडणुकीसाठी कसली कंबर;१६ एप्रिलला नाशिकचा दौरा

    01-Apr-2025
Total Views |
 
Municipal elections
 (Image Source : Internet)
नाशिक :
विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यासाठी उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) १६ एप्रिल रोजी नाशिकच्या दौऱ्यावर येत आहे.
 
ठाकरे यांच्या उपस्थितीत मनोहर गार्डन येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात ते शहर-जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसमवेत संवाद साधत मार्गदर्शन करणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांकडून विभागीय बैठका घेण्यात येणार आहेत.
 
शालिमार चौकातील पक्ष कार्यालयात रविवारी (दि.३०) आयोजित पत्रकार परिषदेमध्ये उपनेते सुधाकर बडगुजर यांचेसह संपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी.जी सूर्यवंशी यांनी ठाकरे यांच्या दौऱ्याची माहिती दिली. यावेळी महानगरप्रमुख विलास शिंदे, उपजिल्हाप्रमुख,देवानंद बिरारी,महेश बडवे,गुलाब भोये,दिलिप मोरे,विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे, युवासेना राज्य विस्तारक प्रवीण चव्हाण,मतदार यादी प्रमुख मसूद जिलानी,विभागप्रमुख नितीन जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.