(Image Source : Internet)
नागपूर:
आजपासून म्हणजे 1 एप्रिल रोजी तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या (LPG gas) किमतीत मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. आज व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर 41 रुपयांनी स्वस्त झाला आहे, त्यानंतर दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत आता 1762 रुपये झाली आहे. विशेष म्हणजे दर महिन्याला गॅसचे दर बदलतात, आजपासून नवीन किंमती देखील लागू झाल्या आहेत.
कालपर्यंत दिल्लीत व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 1803 रुपये होती. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमतींचा आढावा घेतला जातो. मार्च महिन्यात हा सिलिंडर 6 रुपयांनी महागला होता, तर फेब्रुवारीमध्ये तो 7 रुपयांनी कमी झाला होता.
दरम्यान घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही आणि त्याचे दर स्थिर आहेत ही दिलासादायक बाब आहे.