(Image Source : Internet)
नवी दिल्ली:
वाहतुकीशी संदर्भात मोदी सरकारने (Modi govt) नवा कडक नियम लागू केला आहे.जर तुम्ही तीन महिन्यांच्या आत तुमच्या वाहनाच्या ई-चलानाचा दंड भरला नसेल, तर तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित होऊ शकते. एवढेच नाही, तर एका आर्थिक वर्षात तीन वेळा वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहनचालकांचे लायसन्स किमान तीन महिन्यांसाठी जप्त केले जाऊ शकते.त्यामुळे वाहनचालकांनी वेळीच आपल्या ई-चलानाची देय रक्कम भरावी, अन्यथा मोठा दंड भरावा लागू शकतो.
जर तुम्ही वेळेत ई-चलान भरले नाही, तर तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर थेट परिणाम होऊ शकतो. यामुळे भविष्यात वाहन चालवताना अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. सरकार आता कोणत्याही प्रकारच्या नियमभंगास सहन करणार नाही, त्यामुळे वेळीच दंड भरा आणि वाहतुकीचे नियम पाळा.
सरकार आता बेपर्वा वाहनचालकांवर अधिक कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. ई-चलानाच्या फक्त 40% रक्कम वसूल झाली असून, मोठ्या प्रमाणावर वाहतूक नियमांचे उल्लंघन होत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या आर्थिक वर्षात किमान दोन चलान थकवलेल्या वाहनचालकांसाठी त्यांच्या वाहनाच्या विम्याचा प्रीमियम वाढवण्याचा विचार केला जात आहे.