भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष ६ एप्रिलला जाहीर होणार; 'या' चार नेत्यांची नावे चर्चेत

    31-Mar-2025
Total Views |

BJP
(Image Source : Internet)
नवी दिल्ली:
भाजपाच्या (BJP) राष्ट्रीय अध्यक्षपदाची कोणत्या नेत्याची वर्णी लागणार , याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे.
 
तसेच नड्डा (J. P. Nadda) यांचा कार्यकाळही संपला आहे. त्यामुळे भाजपाचा नवीन अध्यक्ष कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
दरम्यान शिवराज सिंग चौहान, भुपेंद्र यादव , मनोहरलाल खट्टर आणि धर्मेंद्र प्रधान ही चार नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. येत्या ६ एप्रिलला भाजपाचा स्थापना दिवस आहे. त्यामुळे या दिवशी नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.
 
२०१९ ला जे.पी.नड्डा हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. त्यांच्या कार्यकाळात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. आता त्यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे लवकरच भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष जाहीर होईल.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपद दिलं जाईल अशाही चर्चा रंगल्या होत्या. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आपण महाराष्ट्रातच राहणार असे सांगितले होते.साधारण वर्षभरापूर्वी विनोद तावडेंचेही नाव चर्चेत होते.पण आता नवे चार चेहरे चर्चेत आले आहेत.