(Image Source : Internet)
नागपूर :
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी (PM Narendra Modi) यांचे एक दिवसाच्या नागपूर दौऱ्यासाठी रविवारी स. ९ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथे आगमन झाले.
विमानतळावर त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ,राज्यमंत्री आशिष जैस्वाल, मुख्यसचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल, जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर, पद्मश्री सन्मानित डॉ अनिल महात्मे यांनी स्वागत केले.
पंतप्रधान मोदी दीक्षाभूमी तसेच रेशीमबाग येथील स्मृती मंदिराला भेट देऊन अभिवादन करणार आहेत. यांनतर ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.