मोदी सरकारकडून मुस्लिम बांधवांन ईदची भेट; सौगत -ए- मोदी किटचे करण्यात येणार वाटप

    26-Mar-2025
Total Views |
 
Modi govt
 (Image Source : Internet)
मुंबई :
मोदी सरकारने रमजान आणि ईदच्या काळात गरजू मुस्लिम (Muslim) कुटुंबांना मदतीचा हात देण्याचानिर्णय घेतला आहे. देशभरातील ३२ लाख गरीब मुस्लिम कुटुंबांना आवश्यक वस्तूंचे कीट वितरित करण्यात येणार आहे. हा उपक्रम भाजप देशपातळीवर राबवणार आहे. यामुळे देशभरातील मुस्लिम कुटुंबांना ईदी मिळणार आहे. रमजान आणि ईदच्या काळात गरजू मुस्लिम कुटुंबांना मदतीचा हात देण्याचा आहे. देशभरातील ३२ लाख गरीब मुस्लिम कुटुंबांना आवश्यक वस्तूंचे कीट वितरित करण्यात येणार आहे. हा उपक्रम भाजप देशपातळीवर राबवणार आहे. यामुळे देशभरातील मुस्लिम कुटुंबांना ईदी मिळणार आहे.
 
या उपक्रमाच्या माध्यमातून भाजपाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे ३२,००० पदाधिकारी देशभरातील ३२,००० मस्जिदींना संपर्क साधून गरजू कुटुंबांपर्यंत मदतीचा हात पोहोचवतील. या अभियानाची अधिकृत घोषणा भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी केली. या वेळी भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस दुष्यंत कुमार गौतम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी या उपक्रमावर सविस्तर चर्चा करून गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याची तयारी केली आहे. यामुळे रमजानच्या पवित्र काळात गरीब आणि वंचित घटकांना मदत मिळणार आहे.
 
सौगात-ए-मोदी किटमध्ये काय आहे?
मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र असलेला रमजान महिना सुरू आहे. रमजान ईदला भाजप आपल्या अभियानाद्वारे मुस्लिमांपर्यंत पोहचू इच्छित आहे.त्यांच्या सौगात-ए-मोदी भेटवस्तू कीटमध्ये कपडे,खजूर,मेवा,साखर इत्यादी असेल. त्याशिवाय महिलांना देण्यात येणाऱ्या कीटमध्ये सूटचे कापड आणि पुरुषांच्या किटमध्ये कुर्ता पायजम्यासाठीचे कापड असणार आहे.