एकनाथ शिंदे यांनी फक्त थातूरमातूर उत्तरे दिली; 'त्या' बैठकीवरुन आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

    25-Mar-2025
Total Views |
 
Aditya Thackeray
 (Image Source : Internet)
मुंबई :
मुंबईत सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या निकृष्ट कामाच्या दर्जाबाबत सोमवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात मुंबईतील सर्वपक्षीय आमदारांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे समोरासमोर आले होते. मात्र या बैठकीनंतर आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
 
एकनाथ शिंदे नगर विकास खात्याचे मंत्री आहेत, त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून हा सगळा घोळ घातलेला आहे. ते पूर्ण बैठकीत उपस्थित असतील, असे आम्हाला अपेक्षित होते. पण थोड्या वेळानंतर बैठकीच्या शेवटला येऊन त्यांनी थातूरमातूर उत्तरं दिली. आमच्या मनातली खदखद आम्हाला मांडता आली. मुंबईचे सगळेच रस्ते एकनाथ शिंदे यांच्यामुळे खोदून ठेवलेले आहेत, असे जनतेच्या मनात आहे. एकनाथ शिंदेंच्या कॉन्ट्रॅक्टरमुळे भ्रष्टाचार झालाय हे सगळे आपण पाहतोय. मुंबईची अवस्था खराब झालेली आहे. त्यावर आम्हाला बोलू दिलं, त्यामुळे मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आभार मानतो. अध्यक्षांनी आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या आणि तसे निर्देश देखील दिलेले आहेत.