- अनधिकृत बांधकाम केल्याने मनपाची कारवाई
(Image Source : Internet)
नागपूर :
नागपुर हिंसारानंतर (Nagpur violence) नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दंगेखोरांवर कठोर कारवाईचा इशारा दिला होता. यानंतर हिंसाचारातील आरोपी फहीम खान याच्या घरावर आज सकाळी बुलडोझर चालवण्यात आला.
यशोधरानगरच्या संजय बाग कॉलनीत राहणारा फहीम खान याने घर बांधताना मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केल्याने मनपा प्रशासनाकडून त्याला नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर आज त्याच्या घरावर बुलडोझर चालवून ही कारवाई करण्यात आली. फहीम खानचे कुटुंबीय काल 23 मार्चलाच घर सोडून गेल्याची माहिती आहे.
नागपूर हिंसाचारासंदर्भातील पोलिसांच्या एफआयआरमधून फहीम शमीम खान हाच हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलं आहे. फहीम खान हा मायनॉरिटी डेमॉक्रॅटीक पक्षायचा शहराध्यक्ष आहे. त्याच्या नेतृत्वात नागपुरात हिंसाचार झाल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे.