कॉमेडियन कुणाल कामराने जनभावना व्यक्त केल्या; उपमुख्यमंत्री शिंदेंवरील टीकेवर उद्धव ठाकरेंचे विधान

    24-Mar-2025
Total Views |
 
Uddhav Thackeray
 (Image Source : Internet)
मुंबई :
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने (Kunal Kamra) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर उपहासात्मकपणे टीका केल्यानंतर राजकीय वातवरण तापले आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे यांनी वादावर भाष्य केले. कॉमेडियन कुणाल कामराने जे सत्य आहे ती जनभावना त्याने मांडली आहे. आम्ही आजही म्हणतोय की जे चोरी करतात ते गद्दार आहे. मी महाराष्ट्रातील जनतेला स्पष्ट करु इच्छितो की, कामराच्या येथे झालेली तोडफोड शिवसैनिकांनी केली नसून, शिवसेनेचा त्याच्याशी संबंध नाही. कदाचित ही गद्दारांच्या गटाने केली असेल,असे उद्धव ठाकरे म्हणाले.
 
राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने चाललेलं आहे की, गद्दारांच्या आदर्शाने चाललं आहे याचा सोक्षमोक्ष लावण्याची वेळ आली आहे. जे भेकड लोक आहेत त्यांना त्या गाण्यावरुन त्यांच्या तथाकथित गद्दार नेत्याचा अपमान झाला असे वाटलं म्हणून तोडफोड केली. हे गद्दार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोरटकर, सोलापूरकर दिसत नाही. कोशारी यांनी अपमान केला तेव्हा त्यांचा निषेध करण्याचे धाडस नव्हते. हे भेकड लोक आहेत आणि गद्दारच आहे. त्यामुळे कुणाल कामराने अयोग्य केले असे मला वाटत नाही. त्याने जनभावना व्यक्त केल्या असल्याचे ठाकरे म्हणाले.