(Image Source : Internet)
नागपूर :
औरंगजेबच्या कबरीवरुन राज्यातील वातावरण तापलेलं असताना नागपुरात सोमवारी (१७ मार्च) हिंसाचार भडकला. दोन गट आमनेसामने आले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत एकमेकांवर दगडफेक केली. स्थानिक नागरिक आणि पोलिसांवर हल्ले करण्यात आले. सार्वजनिक मालमत्ता आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी अनेकांना अटक केली.
या हिंसाचाराचा प्रमुख आरोपी आणि घटनेचा मास्टर माईंड असलेल्या फहीम खान याचा घरावर कारवाई करण्यात आली आहे. फहीम खान याच्या घरावर मनपाकडून आज बुलडोझर चालवण्यात आला.तसेच याप्रकरणातील दुसऱ्या आरोपीच्या घरावरही मनपाने हातोडा चालवला.
फहीम खाननंतर आता युसुफ शेख या आरोपीच्या घरावर मनपाने अतिक्रमणाची कारवाई केली. तर शाहीन अमीन या आरोपीचे दोन दुकाने सिल करण्यात आली आहे .संजय बाग कॉलनीतील फहीम खानचे घर नागपूर महानगर पालिकेच्या पथकाने जमीनदोस्त केले आहे. त्यानंतर नागपूर हिंसाचारात आरोपी युसुफ शेख यांचे नागपूरच्या महाल भागातील जोहरीपूर येथे घर त्यावर पालिकेने हातोडा चालवला आहे.