देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा;संजय राऊतांची मागणी

    24-Mar-2025
Total Views |
 
Devendra Fadnavis Sanjay Raut
 (Image Source : Internet)
मुंबई :
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. यावरून संतप्त शिवसैनिकांनी कामरा याचे खार येथील ‘द हॅबिटॅट क्लब’मध्ये जाऊन मोठा राडा करत सेटची तोडफोड केली.यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले.
 
महाराष्ट्राला कमजोर गृहमंत्री लाभले आहेत. पोलिसांच्या उपस्थितीत ५०-६० जण स्टुडिओ फोडतात आणि पोलिस फक्त बघ्याची भूमिका घेतात. यावरून हे स्पष्ट होते की, राज्यात गुंडाराज सुरू आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राऊत यांनी केली.
 
ज्याप्रमाणे नागपूरमध्ये दंगलखोरांकडून नुकसान भरपाई घेतली जाते, त्याचप्रमाणे कुणाल कामराचा सेट तोडणाऱ्यांकडूनही नुकसान भरपाई घेणार का?त्यांनी यावरून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.राऊत यांनी मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी सांगितले की, ही संपूर्ण घटना दीड-दोन तास आधीपासून नियोजित होती. तरीही पोलिसांनी वेळेवर कारवाई का केली नाही?असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
 
तसेच त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीची मागणी करत, संबंधित पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची गरज असल्याचे नमूद केले. या संपूर्ण प्रकरणामुळे महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आता फडणवीस काय भूमिका घेतात,हे पाहावे लागेल.