(Image Source : Internet)
मुंबई :
शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे समोरासमोर आल्याचे पाहायला मिळाले. मुंबईत रस्ते कामाच्या संदर्भात एक बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह आदित्य ठाकरे उपस्थित आहेत. या बैठकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे आमनेसामने आले आहेत. या बैठकीदरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे आमनेसामने आल्याचे दिसत आहे. मुंबईतील रस्ते कामाच्या बैठकीत आदित्य ठाकरे- शिंदे समोरासमोर आले. एकनाथ शिंदे येताच सर्व आमदारांनी उभं राहून स्वागत केले. मात्र आदित्य ठाकरे आणि त्यांचे आमदार हे खालीच बसूनच राहिल्याचे पाहायला मिळाले.