(Image Source : Internet)
रायगड:
जिल्ह्यात आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची ताकद कमी होताना दिसत आहे. महाडमधील त्यांच्या मजबूत उमेदवाराने आता अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीत जाण्याची तयारी दर्शवली आहे, ज्यामुळे कोकणात राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रायगड जिल्ह्याच्या महाड मतदारसंघातील प्रमुख चेहरा स्नेहल जगताप या आता उद्धव ठाकरे गटाचा निरोप घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. या बाबतची अंतिम चर्चा सुतारवाडी येथे होणार आहे. या बैठकीस स्नेहल यांचे काका हनुमंत जगताप, तसेच सुनील तटकरे यांच्यात चर्चा अपेक्षित आहे. स्नेहल या बैठकीला उपस्थित नसल्या तरी हा पक्षप्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे.
दरम्यान, यापूर्वी स्नेहल जगताप यांचा भाजपमध्ये जाण्याचा विचारही सुरू होता. मात्र, परिस्थिती बदलत गेल्याने त्यांनी राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे.