नागपूर हिंसाचार; एमडीपीच्या कार्यकारी अध्यक्षासह युट्युबरला अटक

    22-Mar-2025
Total Views |
 
Nagpur violence
 (Image Source : Internet)
नागपूर :
नागपूर हिंसाचार (Nagpur violence) प्रकरणात पोलिसांनी पुन्हा दोन आरोपींना अटक केली आहे. हमीद इंजिनिअर याला अटक करण्यात आली आहे. हमीद इंजिनिअर मायनॉरीटी डेमोक्रॅटीक पक्षाचा कार्याध्यक्ष आहे. नागपूरातील दंगल प्रकरणात कट रचल्याचा त्याच्यावर आरोप आहे. औरंगजेब समर्थक म्हणून त्याची ओळख आहे.
 
सोशल मिडिया मीडियावर भडकवणारे व्हिडिओ टाकल्याचा त्याचावर आरोप आहेत. ज्या भागात हिंसाचार घडला त्याच परिसरात हमीद इंजिनिअर राहतो. यासोबतच पोलिसांनी सोशल मीडियावर भडकवणारे व्हिडिओ टाकणारा मोहम्मद सहजाद खान यालाही अटक करण्यात आली आहे. तो युट्यूबर आहे. तो डिजिटल पोर्टल चालवतो. औरंगजेब कबर विरोधातील आंदोलनाविरोधात त्याने व्हिडिओ व्हायरल केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
 
दरम्यान नागपुरात १७ मार्च रोज हिंसाचाराची घटना घडली. या घटनेदरम्यान काही समाजकंटकांनी जाळपोळ, वाहनांची तोडफोड आणि पोलिसांवर हल्ले केले. या हिंसाचारामुळे नागपुरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.