(Image Source : Internet)
नागपूर:
नागपूर दंगल प्रकरणी पोलिसांनी दंगलीचा सूत्रधार फहीम खानसह (Faheem Khan) ५० दंगलखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात फहीम खानला अटक करण्यात आली आणि नंतर त्याला पोलिस कोठडीत पाठवण्यात आले. आरोपी फहीम खानने शुक्रवारी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. जामीन मागताना फहीम खान यांनी म्हटले आहे की, राजकीय दबावाखाली त्यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
मला अडकवले जात आहे - फहीम खान
फहीम खान यांनी स्वतः याचिकेत दावा केला आहे की त्याला या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने गोवले जात आहे. राजकीय सूडबुद्धीने त्याला अडकवले जात आहे, केवळ एखाद्याचे नाव एफआयआरमध्ये आहे म्हणून,असा निष्कर्ष काढता येत नाही की ते हिंसाचारात सक्रियपणे सहभागी होते. फहीम खानने जामिनाची विनंती केली आणि दावा केला की ही कारवाई राजकीय द्वेषाने प्रेरित होती.आता यावर न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.