(Image Source : Internet)
नागपूर :
समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Highway) टोल दरात वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.1 एप्रिलपासून वाढीव दरात टोल वसूल करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने समृद्धीवरील टोलमध्ये 19 टक्क्यांची वाढ केली आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवे लिमिटेड या कंपनीने ही माहिती दिली आहे.येत्या 1 एप्रिल 2025 पासून 31 मार्च 2028 पर्यंत ही टोल वाढ लागू असणार आहे.
नागपूर ते मुंबई या 701 किलोमीटर अंतरापैकी नागपूर ते इगतपुरी हा 625 किलोमीटरचा मार्ग सुरू झाला आहे. येत्या महिनाभरात इगतपुरी ते उर्वरित 76 किमीचा मार्ग देखील सेवेत दाखल होणार आहे.
नागपूर ते इगतपुरीपर्यंत इतका टोल द्यावा लागणार-
कार, हलकी वाहने - सध्याचे दर 1080 रुपये, नवीन दर 1290 रुपये
हलकी, व्यवसायिक, मिनीबस - सध्याचे दर 1745 रुपये, नवीन दर 2075 रुपये
बस अथवा दोन एक्सेल ट्रक- सध्याचे दर 3655 रुपये, नवीन दर 4355 रुपये
तीन एक्सेल व्यवसायिक - सध्याचे दर 3990 रुपये, नवीन दर 4750 रुपये
अवजड बांधकाम यंत्रसामुग्री - सध्याचे 5740 रुपये, नवीन दर 6830 रुपये
अति अवजड वाहने - सध्याचे दर 6980 रुपये, नवीन दर 8315 रुपये