मुख्यमंत्री फडणवीसांची दिशा सालियन प्रकरणात पहिली प्रतिक्रिया समोर,म्हणाले...

    21-Mar-2025
Total Views |
 
CM Fadnavis
 (Image Source : Internet)
नागपूर :
दिशा सालियन (Disha Salian) मृत्यू प्रकरणावरुन मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणाची पुन्हा एकदा नव्याने चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे. दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी जून 2020 मध्ये दिशाच्या मृत्यूच्या गूढ परिस्थितीत नव्याने चौकशीची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
 
या प्रकरणात शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे यांचेही नाव समोर आले आहे. यावरून सत्ताधाऱ्यांनी आदित्य आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली.यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले.
 
फडणवीस म्हणाले की, न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमुळे या प्रकरणावर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली.
 
यासंदर्भात दिशा सालियनच्या वडिलांनीही याचिका दाखल केली आहे. शासनाची भूमिका यासंदर्भात पक्की आहे. न्यायालय काय म्हणते? न्यायालयात ते काय पुरावे देत आहेत? यावर पुढची भूमिका ठरेल. आत्तातरी शासनाच्या किंवा पोलिसांच्या पातळीवर हा विषय नाही. न्यायालय ज्या प्रकारे आम्हाला आदेश देईल किंवा न्यायालयात जर काही नवीन पुरावे, गोष्टी आल्या तर त्या आधारावर त्या वेळी सरकार निर्णय घेईल. आत्तातरी आम्ही न्यायालयाकडे नजर ठेवून आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.