राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतरच लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार ; अजित पवारांचे विधान

    21-Mar-2025
Total Views |
 
Ajit Pawar
(Image Source : Internet) 
मुंबई :
लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना 2100 रुपये कधी मिळणार हा प्रश्न वारंवार करण्यात येत आहे. याबाबत आता स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केले.
 
राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव मदत देण्यात येईल, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी विधानसभेत केले. सगळी सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही,असेही पवार म्हणाले.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव मदत देण्यात येईल, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी विधानसभेत केले.
 
विधानसभेत सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पातील वित्त, नियोजन, अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अनुदानाच्या मागण्या मंजूर करण्यात आल्या. तत्पूर्वी झालेल्या चर्चेला उत्तर देताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव अनुदान देण्याच्या मागणीवर सरकारची भूमिका स्पष्ट केली. सध्या आम्ही लाडक्या बहिणींना कबूल केल्याप्रमाणे मदत देत आहोत. त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारली की आम्ही पात्र महिलांना 2100 रुपये देऊन, असे पवार म्हणाले.