आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार?दिशा सालियन प्रकरणावरून शिवसेना शिंदे गटाचे विधानभवनात आंदोलन

    20-Mar-2025
Total Views |
 
Disha Salian case over Aditya Thackeray
(Image Source : Internet) 
मुंबई :
दिशा सालियन (Disha Salian) प्रकरणावरून ठाकरे गटाने नेते आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढणार आहेत. दिशा सालियान यांचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या याचिकेमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्याविरोधात FIR दाखल करण्याची मागणी करण्यात आली. तसेच या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे (CBI) सोपविण्याची विनंती करण्यात आली आहे. या मुद्द्यावरून विधानभवन परिसरात शिंदे गटाने आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाला सुरुवात केली आहे.
 
आदित्य ठाकरे यांच्यावर केस दाखल करून त्यांना अटक करून चौकशी करावी अशी सत्ताधाऱ्यांची मागणी आहे. तर औरंगजेबाचे प्रकरण अंगावर शेकल्याने त्यावरून लक्ष हटवण्यासाठी हे प्रकरण पुन्हा उकरून काढल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. दिशा सालियन प्रकरणावरू आता शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची ‘सीबीआय’कडून सखोल व निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, या मागणीसाठी आज शिवसेना आमदारांनी विधानभवन परिसरात फलक झळकावत मूक आंदोलन केले. या हत्य प्रकरणी दिशाच्या वडिलांनी काही लोकांवर संशय व्यक्त केला आहे. ही अतिशय गंभीर बाब असून, दिशाच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी शिवसेना आमदारांनी यावेळी केली.
 
विधानभवन करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे म्हणाल्या की, दिशा सालियन हिच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. दिशा सालियनला न्याय मिळाला पाहिजे, असे आमचे म्हणणे आहे. आदित्य ठाकरे यांच्या सोबत माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचे नाव येत आहे. सालियन कुटुंबाला कोणी त्रास दिला का, दबाव टाकला का याची चौकशी व्हायला हवी, असे कायंदे म्हणाल्या. या प्रकरणाला कोणताही राजकीय रंग दिलेला नाही. पाच वर्ष न्याय न मिळाल्याने दिशा सालियन हिच्या वडिलांनी न्यायालयात धाव घेतल्याचे त्या म्हणाल्या.