(Image Source : Internet)
मुंबई:
दिशा सालियन (Disha Saliyan) मृत्यू प्रकरणात सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे या प्रकरणाने पुन्हा राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. हे पाहता आज विधानसभेत भाजप नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत.
उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंना कॉल केला होता. तुम्हालाही दोन मुलं आहेत. माझ्या मुलाकडूनही चूक झाली असेल. त्याला वाचवा असे उद्धव ठाकरे म्हणाले होते, असा दावा कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी केला आहे. नारायण राणे यांना एकदा नव्हे तर दोन वेळा कॉल केला होता. तुम्हालाही दोन मुल आहेत. माझ्या मुलाकडूनही काही चूक झाली असेल, तर त्याला वाचवा. नारायण राणेंनी हे जाहीरपणे सांगितलेले आहे,असा दावा करत नितेश राणेंनी दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंबद्दल मोठा गौप्यस्फोट केला.