(Image Source : Internet)
नागपूर :
शहरात झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी 80 जणांना ताब्यात घतलं आहे, धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये 11 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. अशी माहिती पोलिस आयुक्त (Police Commissioner) रविंद्र सिंगल यांनी दिली.
दंगल घडविणारा मास्टरमाईंड फहीम खान दोन-तीन ठिकाणी दिसून आल्याचंही यावेळी आहे. तो सातत्यानं आपला ठिकाण बदलतोय, त्यामुळं त्यावर देखील लक्ष ठेवलं जात आहे. त्याचा इतिहासही तपासला जात आहे. त्यानुसार या सर्व गोष्टी आम्हाला विशिष्ट गोष्टीकडं घेऊन जात आहेत. पण त्या दिशेने आमचा तपास सुरु असल्याचे सिंगल म्हणाले.
औरंगजेबाची कबर हटवण्यावरुन विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी केलेल्या आंदोलनानंतर नागपूरमध्ये दोन गटात भडकलेल्या दंगलीत मोठ्या प्रमाणावर दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती.तसेच पोलिसांवर हल्लेही करण्यात आले होते.